झोपाळा....
झोपाळा....
1 min
382
झोपळ्यावरी
बसूया की टाळून
मांडी घालून....
ऐक ग ताई
ऐक ना माझे जरा
नको हा वारा...
सावकाशच
झोका घेऊ एकदा
येऊ दे दादा...
गप्प बैस त
दोघी आहोत की रे
लागू दे वारे ....
भीती कशाला
बाळगतो रे वेड्या
आम्ही खड्या...
चल नको ग
हट्ट उभ्याचा धरू
समेट करू.....
येऊ दे वारे
होऊ दे झोका सुरू
ग भुरू भुरू....!
