झोपाळा
झोपाळा
दारी मंद सुगंधी मोगरा
गार गार थंड हवा
सोबत साथीला झोपाळा
मग काय उणे या जीवा
शांत निरव सायंकाळी
सोबत तुझी कशी ती
भूतकाळातील गोड आठवणी
डोके काढुनी वर येती
सांज समयी साथ तुझी
आठवणी त्या माहेराच्या
कललेले ते रविबिंब नि
शांत चित्तवृत्ती मना मनाच्या
घंटानाद मंदिराचा कसा
सांजवात तेवे गाभारी
शांत सोज्वळ कृष्ण मूर्ती
भक्त गणास भावे भारी
नामस्मरण करता करता
लईत तुझी हालचाल ना
राधे राधे कृष्ण कृष्ण स्मरत
तृप्त करी कसे जड मना
कुठे सगे सोयरे ते!!
कुठे मित्र मैत्रिण कशी?
आयूष्याच्या वळणावरती
खरा सोबती तू असशी
देशील का रे ! अशीच साथ तू
भूतकाळ तो जपताना
तुझ्या सवे मज छान वाटे
उंच भरारी घेताना
उंच भरारी घेताना
