झोमॅटोवरून अॉर्डर करू...
झोमॅटोवरून अॉर्डर करू...
वैतागलेला मी
गर्दीतुन कशीबशी
वाट काढत
घरी जात होतो...
ऑफिसच्याच कॅटिनमधे बसुन
पाववडा, समोसे, कॉफी खाऊन
घरी परत येत होतो...
कानाला मोबाईल धरून
कॉल चालुच होते
फुटपाथावर चढताच
गरम गरम कालवण व भाकरीचा वास
नाकात शिरला माझ्या...
काहीतरी हरवलेल
आता सापडले
असा भास झाला मला...
सरळ त्या फुटपाथावरच्या झोपडीकडे
बघण्याच धाडस झाल नाही माझ्याने
थोड्यावेळ उगाच कानाला मोबाईल धरून
ऊभा राहीलो
नाकात ऊरात तो ताज्या कालवण भाकरीचा वास घेण्यास...
खरतर लाज लज्जा बाजुला ठेवुन
त्या चुली पुढेच फतकल मांडुन
ती तव्यावरची गरम भाकर हातात घेऊन त्यावर थोड कालवण टाकुन फडश्या पाडायचा होता व
तृप्ततेची ढेकर देऊनच उठायच होत चुली पुढून...
मनात हा खेळ चालु होता
चाळवलेल्या भुकेला
झोमॅटोवर ऑर्डर करण्या बोट
मोबाईल पडद्यावर सरकवल...
मनातच शिव्या मोठ्या रेस्टॉरंटच्या मेनुला दिल्या
अस ताज ताज अन्न कुठे आता ऑर्डर करू झोमॅटो, ऊबेर इटसवर...
तीन-चार वर्ष झाली असतील
झोमॅटो उबेर इटस् वरूनच जेवण ऑर्डर करत होतो...
नाकात दरवळलेल्या त्या अन्नाच्या वासान
करून दिली आठवण
झोमॅटो, ऊबेर इटस अपॅवर नाही मिळणार असे हे अन्न...
घरची चुल पेटव जमेल तसे तुच शिजव तुझ्या साठी अन्न
बघ ते खाल्यावर देशिल तृप्ततेची ढेकर
नसेल मग अॅसिडीटी होतेची कुरबुर सतत!!!
