झेप
झेप
1 min
280
धुंद-बेधुंद घेते मनभाव
गरूडाची झेप कधी
मानवूनही अवस्था अजाणत
होतेय निष्ठूर कधी
भरारी भाव का
डगमगवते तोल कधी
भिरभिरणार पाखरु अविचाराने
होते अधीर कधी
आरशातली प्रतिमा दाखवते
रुसवे क्षण कधी
कोणी म्हणेल, उदासीनता
घालते पिंगा कधी
अनुभवते क्षिणता विचारधारेत
अधुन मधून कधी
कल्लोळ माजवतं मृगजळ
मधुनच अंतःरंगात कधी
न जागणारा उल्हास अधिक
जागवत असते कधी
स्वचा सुखसागर भरतीत
मनःशांती देते कधी...
