STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

झेप उंच तू घेई

झेप उंच तू घेई

1 min
530

विस्तीर्ण तुझे आकाश हे

झेप उंच तू घेई

तुच शारदा तुच दुर्गा

तुच भवानी आई


बोल हे असती बहू मोलाचे

स्त्रीशक्ती जाणूनी घेई

याच शक्तीपीठा समोरी

जग नतमस्तक होई


धरतीची शय्या करुनी

दगड उशाशी घेई

पांघरण्या आकाश बाकी

हवे कशाला काही


पंखामधला जोर तुझ्या

तुच जोखुनी पाही

कोषामधुनी बाहेर ये तू

उंच भरारी घेई


Rate this content
Log in