STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

झेप घे अशी...

झेप घे अशी...

1 min
196

सामर्थ्य आहे हातात तर

 स्वप्ने डोळ्यात घेऊन चल

 परिस्थिती असो कशी,

तू नेहमी झेप घेत चल

 

झेप घे अशी की 

पाहणा-यांच्या माना दुखाव्यात 


आकाशाला अशी गवसणी घाल 

की पक्ष्यांना प्रश्न पडावा 


ज्ञान इतके मिळव की, 

सागर अचंबीत व्हावा 


इतकी प्रगती कर की

 काळही पाहत रहावा 


सदैव कार्य तत्पर रहा नारी तू

 की सर्वांना तुझा अभिमान वाटावा


 


साहित्याला गुण द्या
लॉग इन