झाडू
झाडू
1 min
197
झाडू सांगतो कचरा काढा
घरदार सगळे स्वच्छ करा
काम झाल्यावर कोपऱ्यात पडा
चांगल्या गोष्टींची कास धरा .
झाडू काढतो जळमटं धूळ
करतो खरी तो साफसफाई
नवीन झाडूचं नवीन खूळ
मनातलं साध्य करून घेई .
झाडू म्हणजे एकतेचे प्रतीक
काड्याहिरांची गुंतागुंत एकमेकांत
आम्हा प्रत्येकाला सांगतो शीक
सगळ्यांनी एकत्र रहावे शांत निवांत
जुने झाडू होतात थिजलेले
जीवन सार्थकी लावलेले
मेणबत्तीसारखे झिजलेले
स्वच्छतेसाठी जीवन अर्पिलेले
झाडूला नाही ऐट, नाही मिजास
पाहिजे स्वच्छता मनाची
त्याला महत्त्व असं नाही खास
पण जोड आहे कर्तृत्वाची
