झाडी कविता
झाडी कविता
1 min
268
झाडी बोलीतील कवी
शब्द माझे गावरान
माझा गावंडळ पाहून
बाकी कवी झाले हैराण
मी लिहिलं भ्रष्टाचार
हे बटे सळले राव
बाकी म्हणे हा का लिहतो
याला दाखवा याचा गाव
मला लागली तपन
तेव्हा मागतली छाव
तपन तपन करते हा
अरे याचं काय आहे नाव
शब्द शब्द शोधता
एक शब्द खोपडीतला
गरिबीतील हा शब्द
दादा आता बोल झोपडीतला
मन मन म्हणतो
पण कोणी बोलेना
मन म्हणजे सांग असं बाबा
अरे तुझी भाषा समजेना
चला सर्व जन
सेवा करू साहित्याची
प्रमाण असो या मायबोली
लिखत राहू भाषा सत्याची
