STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Others

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Others

जगून घे

जगून घे

1 min
281

जन्म हा एकदाच आहे

कर जन्माचे सार्थक

कसल्या मोहापायी

नको घालवू निरर्थक


माणुसकी जाणून

करावे तू सत कर्म

जीवनी सत्य, अहिंसा

असे हाच खरा धर्म


संघर्षाच्या कट्यावर

मनू नकोस हार

विज्ञानाची कास धरुनी

कर अंधश्रद्धेवर प्रहार


तुझ्यामुळे तू जगी

दुखवू नको कोणाला

सुख वाटून साऱ्यांना

समाधान मिळेल मनाला 


जन्म तुझा एकदाच असे

तू जगून घे भरभरून

मात्र जन्मदात्यांचे कधी

तू विसरू नको रे ऋण


Rate this content
Log in