जगून बघ..
जगून बघ..
कुटुंबासाठी नेहमी तू जगते
थोड स्वतःसाठी ही
मनमुरादपणे जगून बघ
स्वतःच्या जगात व्यस्त
राहण्यापेक्षा कधीतरी
दुसऱ्या ही विश्वात रमून बघ
जीवनात सुख दुःख हे चालणारच
चिमुटभर दुःखाने कोसळून नकोस
दुःखाचे पहाड ही हिमतीने चढून बघ
इतरांसाठी तू नेहमीच जगते
कधीतरी स्वतःसाठी जगून बघ
कधीतरी मनाविरुद्ध वागून बघ
प्रेमळ राग अनुभवून बघ
उगीचच कोणाला चिडून बघ
कधी खळखळून हसून बघ
तर कधी मनसोक्त रडून बघ
इतरांसाठी तू नेहमीच जगते
कधी स्वतःसाठी जगून बघ
कधीतरी लहान
मुलांसारखा हट्ट करून बघ
गुलाबी थंडीत
आईस्क्रीम खाऊन बघ
पावसाचे थेंब कधी तरी ओंजळीत घेऊन बघ
इतरांसाठी तू नेहमी जगते
कधी स्वतःसाठी जगून बघ
कधी तरी एकांतात आठवणीतल्या भावना
मनात फुलवून बघ आयुष्याच्या कागदावर
रंगाची उधळण करून बघ कुठेतरी भेटतात स्वप्ने उद्याची
त्या स्वप्नामध्ये, क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलुन बघ
जीवन अधिक सुखकर होईल
कधी तरी स्वतःसाठी जगून बघ
कधी घे यशाची उंची भरारी
स्वतःमधल्या स्वतःला
जिंकून बघ
वेदना होतात, राग पण येतो खूपदा पण
व्देषाला खतपाणी न घालता फक्त
तुझ्यातला निर्मळ पणा समोर ठेवून बघ
आयुष्यात वळणे ही येतातच
पण त्या वळणावर न थांबता
योग्य गती घेऊन पुढे चालून बघ
इतरांसाठी तू जगते नेहमी कधीतरी स्वतःसाठी जगून बघ..
