जगणे
जगणे
1 min
220
मनाच्या बंदीवासात
अश्रुही बंदीवान झाले
पानावलेल्या डोळ्यांना बघून
आता कैक साल झाले
सलेले अग्नी दाह
थंड राख झाले
मनाचे चारही कोपरे
आता सुनसान झाले
ते कधी जगणे ते
सुगंधित केवड्याचे
मरणे मृगकस्तुरीचे
आता गंधहीन झाले
चिमणी पाखरे आता
घराला परदेशी झाले
होते कधी स्वप्नांचे
आता घर ते उजाड झाले
शुष्क डोळ्यांतून
जणू प्राण मुक्त झाले
देहाची चिता करत
जगणे शमशान झाले
