जगणे भिकारी..!
जगणे भिकारी..!




स्वप्ने सारी अभावाची
अजूनही अधांतरी,
रोखूनिया संगिनीला
कशी करावी फितूरी...?! १.
'प्रेम' व्यर्थ गोष्ट व्हावी!
आपलीच ही उधारी,
कशी इथल्या सुखाला
होई शूल धारधारी..! २.
लोभ कायेत आसक्त
कशा जिव्हा चाळवती,
मग शाश्वतात मागे
स्वप्नवत राशी किती...?! ३.
सुख हव्यासात नसे
होई आयुष्य ते उणे,
भले राजवैभवी हे
होई भिकारी जगणे...! ४.