STORYMIRROR

Anil Chandak

Others

4  

Anil Chandak

Others

जगी सर्वश्रेष्ठ माय मराठी

जगी सर्वश्रेष्ठ माय मराठी

1 min
312

माझ्या,मराठी मातीचा, गंध वाहे शब्दांतुनी!

सांगे,जगांला  गर्जुनी, आम्ही भाषा अभिमानी !!1


बहुविध अलंकारी,शब्द सुमन प्रतिभा!

साऱ्या जगती,झळके,काव्य ,वैविध्यांची आभा!!2



कवितांची, रसगात्री,मांदियाळी साहित्यांची!

शब्दाशब्दांतूनी,करी गजर सहिष्णुतेची !!3



तुझी थोरवी,गाती अभंगातूनी गोड गळा !

वैष्णवांची भेटाभेटी,याची देही याच डोळा!!4



दर बारा ,कोसांवरी,भाषा भासते निराळी!

भूभागांचे,प्रतिबिंब,त्यात ,पडते आगळी !!5



ज्ञान सागरी,डुंबूनी, निर्मिले ग्रंथ अपार!

सर्वश्रेष्ठ, महान,विपुल साहित्य भांडार !!6



शुर वीरांच्या, पराक्रमांची,अगाध ती शक्ती !

शिकविते ईश्वराची, सगुण निर्गुण भक्ती !!7



शिवबांच्या , स्वराज्य जरीपटक्याची कमान !

पंढरीची वारी, विठ्ठलाचा सार्थ अभिमान !!8



मायबोली,भाषा मराठी मुलखाची माऊली!

पदराती घालते,वात्सल्याने, देते सावली!!9



आज,इंग्रजी शिक्षणांमागे सारेच लागले !

हाल मराठी भाषेचे,घरच्यांनी इथे केले !!10



भाषा मराठी दिन,कुसुमाग्रज जन्मदिनी!

प्रेमभरे जपण्याची,डोळ्यांत तेल घालुनी !!11



धारामृत, कण तेजाचे,बोली माय मराठी!

आम्ही, बोलतो चालतो, शान,आमची मराठी !!12


Rate this content
Log in