STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Others

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Others

जगावे वेदनेसंगे

जगावे वेदनेसंगे

1 min
188

एक वेदना अशी

अंतर्मनात सलणारी

मायेच्या उसास्यांनी

दुपटीने झोंबणारी


व्यक्त करण्यास

शब्दात न मावणारी

सभोवतालच्या विश्वाला

कवेत सामावणारी


वरवरच्या जखमांना

न जुमानणारी

पण मनावरच्या घावांनी

बारमाही चिघळणारी


तुझ्यातला तू अन मी

माझ्यातला संपवणारी

वेदना फक्त तिचेच

अस्तित्व दाखवणारी


जगावे तर वेदनेसंगे

तिच्याच कुशीत मरावे

जाता मागे मात्र 

आठवणीत तिनेच उरावे


Rate this content
Log in