जगाची या रीतच निराळी
जगाची या रीतच निराळी
1 min
249
आयुष्याच्या वळणारती,
भेटतील हो अनेक नाती,
सगेसोयरे ,सखे,सोबती,
जगाची या रीतच निराळी.
कुणी पुढे चालती,
कुणी मागे खेचती,
तरीही जिंदगी नहीं थांबती.
जगाची या रीतच निराळी.
क्षणाक्षणाला रंग बदलती,
कुणी स्वार्थी, कुणी निस्वार्थी,
पावलागणिक कसे भेटती.
जगाची या रीतच निराळी.
साऱ्यांचा मग विचार करूनि,
आपण कशास बसावे झूरूनि.
उडवू हवेत चिंता सारी,
जगाची या रीतच निराळी.
आनंदाने जगणे आता...
लुटावी मजा तव जीवनाची,
हीच रीत जिंदगी ची.
जगाची या रीतच निराळी.
