जेष्ठ नागरिक
जेष्ठ नागरिक
साठ वर्षांपासून माणसाच्या आयुष्याला
नुकतीच कुठे होते सुरुवात
जेष्ठ नागरिक म्हणून मिरवायला
सुख येते आपल्या पदरांत
अशा वेळी भल्या पहाटे उठून
लोकल बस पकडायची चिंता नसते
आॅफीसमध्ये बाॅसची बोलणी खाऊन
अपमान गिळत बसायचे नसते
शाळा काॅलेजांतल्या मुलांसारखी
घोकंपट्टीची कटकट नसते
मोठ्यांची बोलणी खायची
चिंता ,काळजी अजिबात नसते
साठ वर्षें पूर्ण झाल्यानंतर
स्लो मोशनमधली कामं करायची
घाई बिलकुल करायची नाहीं
जमलं नाही तर सोडून द्यायचीं
कनिष्ठांकडून सन्मान घ्यावा
ज्येष्ठांचा आशिर्वाद तोंडभर
मुलांना,सुना-जावयांना स्नेह द्यावा
कौतुक कामाचे करावे पोटभर
जेष्ठ नागरिकांनी आराम करायचा
योग, वाचन , लेखन करावे
नित्यनेमाचा परिपाठ फिरायचा
बालगोपाळां समवेत रमावे .
