STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

जेंव्हा निसर्ग कोपतो

जेंव्हा निसर्ग कोपतो

1 min
506

निसर्ग देतो चराचराला

भरभरुन जीवन देणं

बुद्धिवंत मानवजातीने

सदा ठेवावे याचे भान


दातृत्वाला निसर्गाकडे

नाही हो कुठलेच माप

बेभान मानवजातीची

हाव वाढलेली अमाप


निसर्ग असे अवलिया

नसे तो आपल्या हाती

अवचित कोपतो जेव्हा

करी सगळ्याचीच माती


पद्धतशीर स्वार्थासाठी

निसर्गाची करता हानी

निसर्गही उठतो खवळून

तो ही करतो मनमानी


आयते मिळाले सारे काही

त्याची वाटली नाही किंमत

निसर्गाने हिसकावता सारे

हतबल झाली सारी हिंमत


वेळीच होवू या आपण जागे

करू आधीच आपत्तीची व्यवस्था 

समतोल राखू या निसर्गाचा मग

कधी होईल अशी दुरावस्था


Rate this content
Log in