STORYMIRROR

Devendra Ambekar

Others

3  

Devendra Ambekar

Others

जे नाही कळत तुला

जे नाही कळत तुला

1 min
1.4K


नजरेत तुझ्या अशी जादू आहे

जे नाही कळत तुला,

तुझ्या वाटेवर नजर ठेवून बसलोय

जे नाही कळत तुला,


तुझ्या आठवणीत

अश्रू ओघळतात

जे नाही कळत तुला,


मनसोप्त हसावस वाटतं

तुझ्या सोबत

असतांना मला

जे नाही कळत तुला,


रिमझिम पावसात भिजावे

तासनतास तुझ्या सहवासात

राहवेसे वाटते मला

जे नाही कळत तुला,


का अशी वागतेस तू

का माझ्यावर रुसतेस तू

तुझ्या विरहात

किती तळमळतोय

काय सांगू मी तुला

जे नाही कळत तुला,


काही चुकलं असेल

तर क्षमा असावी

मला माहित आहे माझ्या

चुकेला माफी नसावी

तरी परत येऊन माझे आयुष्य

सुगंधीमय कर सुंदर फुला

जे नाही कळत तुला...

जे नाही कळत तुला.....


Rate this content
Log in