जबाबदारी...
जबाबदारी...
1 min
433
जन्म देते आई जेव्हा
जग दिसते डोळ्याने
कृतज्ञता व्यक्त करू
रोज तिच्या संस्काराने......१!!
तिची शिकवण जेव्हा
आचरणी उतरते
ममत्वेचे जेतेपद
तिला अर्पियल्या जाते......२!!
खरी जडणघडण
करी आईचं बाळाची
पावलांची खंबिरता
तिच्या मौलिक कर्माची.....३!!
रूप पालवी पिवळी
थरथर शरिराची
आता फुलांची भुमिका
कशी पाहणी माळ्याची.....४!!
ऋतूचक्र फिरणारे
वेळ सर्वास समान
पेरलेले उगवते
वात्सल्याचा असे मान .....५!!
जबाबदारीची जाण
सुसंस्कृत समाजाला
नातं म्हणजे सर्वस्व
वरदान आयुष्याला......६!!
