STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

जावा- जावा

जावा- जावा

1 min
1.7K

दोघी असतात लाडाच्या 

जणू मैत्रिणी असतात जिवाभावाच्या  

कळ्या जशा उमललेल्या वेलीवर जाईजुईच्या 


 *जावा* - *जावा* 

सुख-दुःख उनाडपणे जगणाऱ्या  

अवघडणारया प्रत्येक क्षणी सावरणारं गीत होऊन एकमेकींना असतात सांभाळणाऱ्या  


 *जावा* - *जावा* 

 खळखळून हसणाऱ्या 

सागराची विशालता, नदीचा प्रभाव मनात जपणार्‍या  


 *जावा* - *जावा* 

 कधी चिडून तर कधी चिडवून  

गंमतच काहीवेळ

 एकमेकींवर रुसणारया

नंतर हसायच कस,

हसवायच कस 

हेही माहिती असणाऱ्या 


 *जावा* - *जावा* 

गहिवरून येता कधी डोळ्यात पाणी आणणाऱ्या

 तर कधी तेच डोळ्यातल पाणी अलगदपणे पुसणाऱ्या  


 *जावा* - *जावा* 

गप्पागोष्टी, 

उडवा -उडवी आणि सेल्फी

 असतं यांच सगळाच लय भारी 

खूप दिवसातून भेटल्यावर तर असते मजाच काही न्यारी  


 *जावा* - *जावा*  

विषय तसा अवघडच, कधी धक्क करणारा 

कडू- गोड आठवणीसह 

मिळतो पण

 येथे जीवनाला किनारा 


संकट येताच, येतात एकमेकींच्या मदतीला 

हात हात घेतलाच असतो सांगायला  

"मी आहे" काय, तुझ्या सोबतीला...


Rate this content
Log in