जातिअंत
जातिअंत
आमच्याच माणसाचे आम्ही
कित्येक तुकडे केले
जातीयतेच्या फासात आवळून
राष्ट्रीयत्वाला दहन केले
देवाधर्माच्या जहरी नावाखाली
थाटतोय एक नवा बाजार
अन माणुसकीच्या नात्याचा
हरवलाय मनातून विचार
समानतेच्या रोपांसाठी इथं
महापुरुषांनी दिला मोठा लढा
रंगात वाटून माणसाने माणसाला
जातीयतेचा वाढविला तिढा
कोणी भगवा, कोणी निळा, हिरवा
फेटेही मग बंधू लागले
झेंडे जातीजातीचे आता
गल्लोगल्लीत फडकू लागले
चला तोडू या ही जातीयतेची भिंत
उभारू माणुसकीची नवी गुढी
बंधुभाव, एकता देशात नांदवून
जातीअंताची पेटवूया होळी
