STORYMIRROR

bhavana bhalerao

Others

3  

bhavana bhalerao

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
194

राजे , परत या जरा

फिरुन बघा आख्खा देश

आता लोक फक्त फॅन्सी ङ्रेस पुरताच

घालतात तुमचा वेश.

तुमचा तो प्रखर देशाभिमान,

स्वराज्य निर्माण करण्यासाठीची धङपङ

सगळं विसरुन गेलोय आम्ही,

नवीन गङ किल्ले उभारणी तर सोङाच,

आहे त्यांचीच होतेय पङझङ,

ऊन, वारा पावसात ,काळया मिट्ट अंधारात

काटयांच्या वाटा तर कधी घनदाट जंगल,

लढत होते मावळे,

मातीच्या रक्षणासाठी

आता लढतोय आम्ही

सत्तेच्या खुर्चीसाठी,

राजे......

परत एकदा उपसा तलवार,

मावळ्यांना घेऊन हाताशी,

सांगाल का लोकांना,

शेवटी तुम्ही आम्ही जगतो

ते मातीच्या ईमानीसाठी.



Rate this content
Log in