जाणता राजा
जाणता राजा
जाणता राजा शिवबा
त्रिवार मुजरा तुज महाराजा
स्वराज्याचे तोरण उभारून
हिंदू पदपादशाहीचा झेंडा तू रोवलास
मराठमोळ्या, रांगड्या मावळ्यांना
स्वतंत्र राज्य स्थापून दिलंस
किती त्याग,किती यातना
तू भोगल्यास देवच जाणे
केवळ तुझ्या नजरेच्या धाकावर
संपूर्ण स्रीजात बिनधास्त जगली
तू थोर,तू महान,तू योगी
तुझ्यासम तूच,नाही दुजा कोणी
जिजाऊच्या कणखरतेने
तू बनलास तू अस्सल बाणेदार शिपाई
शत्रूची काय बिशाद
वाकड्या नजरेने पाहिल
तिथल्या तिथेच त्याची तू खांडोळी केलीस
माणसातला देव तू जाणलास
तुझ्यातील देवपण माणसाने जाणले
किती गावा तुझा महिमा
शब्दसाठाही तिथे पडे अपुरा
तू राजा,तू बादशहा,तूच जाणता राजा
मुलासम रयतेची तू बनूनी माय
तूच सांभाळ करावा
जय जय रयतेच्या राजा
