STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
352

अफाट होते शत्रू तरी

तो कधी न डगमगला

गेला आडवा मुघलांना

मूठभर मावळे सोबतीला ।। १।।


एक एक मावळा असा निवडला

जणू रत्नपारखी

याच रत्नांना घेऊन लढला

स्वराज्य आपुले राखी।। २।।


रयतेला संतान मानिले

बाप म्हणूनी सांभाळ करी

कल्याण प्रजेचे ध्येय ठेविले

राजा- प्रजा मिटवली दरी।। ३।।


रयतेच्या राजाचे पोवाडे

शाहीर आनंदे गाती

आदर्श राजा म्हणूनी किर्ती

पसरली सा-या जगती ।। ४।।


गेले किती अन् आले किती

राजे या धरतीवरती

शब्द ऐकता 'राजे' हा

आठवे फक्त नि फक्त शिवछत्रपती।। ५।।



Rate this content
Log in