STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

जाणता राजा...

जाणता राजा...

1 min
340

जाणता राजा संकल्पना

मनामनात घर करुनी राहते

महाराष्ट्राची अस्मिता जगी

जयजयकार करुनी जागते....

शिवाजी राजा एकमेव जगती असा

स्वराज्याचे स्वप्न साकारूनी जगला

कीर्ती रूपे शतकानुशतके

त्रैलोकी अजरामर होउनी उरी राहिला...

महती त्या नावाची

ख्याती त्या जीवाची इतुकी मोठी की

आज त्या जाणत्याची आठवण

कर्तृत्व सम्पन्नतेमुळे मज झाली...

शि व तेज ओटीत

वा ढता वाढले

जि जाऊने जे नऊ मास पोसले

    जे शिवतेज

    शिवाजी म्हणुनी

    भूवरी अवतरले त्यासी

    शिवाजी म्हणुनी संबोधले

शि म्हणजे शिव

वा म्हणजे वायू

जी म्हणजे जिवंत ज्वाला

    अर्थात तेज

जे शिवतेज वाऱ्या सवे आसमंतात

त्रिलोकी पसरुनी आसमंत व्यापले

ते शिवतेज शिवाजी म्हणुनी

नावा रुपास येऊनी

चिरंतन चिरकाल चिरंजीव होउनी



Rate this content
Log in