जाणता राजा
जाणता राजा
शिवरायांचा इतिहास
पूर्वज भोसल्याचा
पाहतो वळून इतिहास
आपण शिवछत्रपतींचा...
जिजाई आई खंबीर
पाठी शिवरायांच्या संगतीला
शहाजी वडिलांचे नेतृत्व
शिवबांच्या सोबतीला...
गुरूंकडून शिकले त्यांनी
शिक्षण राज्यकारभारी
शहाजींनी पाठवले गुरू
शिवबासाठी चतूर व्यवहारी...
स्वराज्याचे ध्येय ठेवले
नजरेसमोर शिवबांनी
तोरणा गड घेवून
बांधले तोरण मावळ्यांनी...
सजले तोरण तोरणावर
उभारी मग आली स्वराज्याला
जिजाऊंना आनंद फार झाला
प्रेमाने जवळ घेतले शिवबाला...
राजगड ही स्वराज्याची
पहिली राजधानी सजली
शहाजी, जिजाऊंनी ती
डोळे भरून पाहिली...
स्वराज्याच्या पाऊलखुणा
उठल्या राजगडावर
स्वराज्याचे तोरण चढले
तोरणा गडावर...
