जाणता राजा
जाणता राजा
शिवनेरी जन्मस्थान
रायगडी राज्याभिषेक छान
उलटावे इतिहासाचे पान अन् पान
वाटतो शिवरायांचा अभिमान ।१।
शिवरायांचा गनिमी कावा
शंभूराजे सिंहाचा छावा
महाराष्ट्र शिवबाच्या नावा
आनंद न गगनी मावा ।२।
जगात आले किती महारथी
शिवराय आपले शिवछत्रपती
जिजाऊ न गेल्या सती
मोडूनी टाकल्या अनिष्ठ रिती ।३।
बंद केला शेतसारा
मुघलांना जीवाशी मारा
वाहतो स्वराज्याचा वारा
हिंदवी स्वराज एकच नारा ।४।
गडकिल्ल्यांचे वैभव साकार
वाढविला स्वराज्याचा आकार
अन्यायाचा केला धिक्कार
झाला स्वराजाचा स्वीकार ।५।
शेतसा~याची असे मुघल सक्ती
शिवबानी दिली मुक्ती
गनिमी कावा एक युक्ती
गाजे मावळे स्वामी भक्ती ।६।
रयतेचा वाली खास
भरवी तोंडभरूनी सुखाचा घास
मावळे शिवबाचे दास
सुटला रयतेच्या गळ्याचा फास ।७।
तोच राज्यकर्ता
स्वराजाचा तोच निर्माता
त्यांसी आजही मान्यता
मिळाली शिवछत्रपती जगमान्यता । ८।
