जाणता राजा
जाणता राजा
सरकार येथे कोणतेही
जाणीव कुठे हो जनतेची
दडवून बसला तो माल
भूक तरी किती खाण्याची
एक होता माझा राजा
म्हणे तो जाणता खरा
केले राज्य अविरत
वाहतो आज ही तो झरा
शिवाजी महाराजांच्या
चरणाची हो सर नाही
राजकारण करतात ते
त्याच्या नावावर आजही
गरीब जगला उद्योग वाढला
शेती प्रगल्भ केली खरी
शेतसारा अडलीला माफ
केला, श्री ची पुण्याई ती खरी
आई बहिणीच्या रक्षणास
नाही मागे तो हटला
घातला अब्रू हात कोणी
तोच तिथे मग छाटला
नाही जात-पातीचं
हे शिवार पेरलं त्यांनी
समभाव बंधुता
दाखवली तेव्हा त्यांनी
म्हणून वाटे आजही आम्हा
व्हावा जाणता राजा कुणी
मग जगेल जनता येथे
असेल असा त्याचा कोणी
