STORYMIRROR

Sarika Musale

Others

4  

Sarika Musale

Others

जाणता राजा शिवाजी महाराज

जाणता राजा शिवाजी महाराज

1 min
389

सोन्याच्या त्या धन्य दिवशी

शिवाईदेवीच्या शिवनेरी

क्रांतीसूर्य उदयास येई


  मावळ्यांबरोबर बाळराजे

  खेळी सह्याद्रीच्या कडेकपारी

  जिजाऊंच्या छञाखाली 

  स्वराज्याचा गरूड झेप घेई


नको गुलामी परक्यांची

रायरेश्वरापुढे साक्ष ठेवी

ऐका हो बालवयात

स्वराज्याची प्रतिज्ञा घेई


  तोरणावर तोरण बांधूनी

  भगवा झेंडा फडफड करी

  शक्तीपेक्षा युक्तीने

  मुघलांना धूळ चाटवी


परस्ञी मातेसमान होती 

गनिमांना कडेलोट शिक्षा होती 

शिवबांची मातृ-पितृभक्ती महान होती 

स्वराज्यावर गनिमांचे संकट

शिवरायांची दूरदृष्टी होती 


   आरमार उभारले समुद्रीकिल्ले बांधूनी

   राज्यकारभाराची घडी बसवली

  अष्टप्रधान मंडळ स्थापूनी


हिंदवी स्वराज्याचा संस्थापक होऊनी

रयतेपायी झिजला जन्मभरी

जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करूनी

निजला रायगडी सर्वांचा निरोप घेऊनी


Rate this content
Log in