STORYMIRROR

Nita Meshram

Others

4  

Nita Meshram

Others

जाणता अजाणता

जाणता अजाणता

1 min
481

जाणता अजाणता

आहे तुझ्या प्रेमात मी

गुंतल्या या क्षणात

आहे अशी बेभान मी

सोबतीला जग सारे

मी सख्या एकटीच आहे

अबोल या ओठांवर

तुझेच एक नाव आहे


जाणता अजाणता

आहे तुझ्या प्रेमात मी

गजरा हा फुलांचा

माळला केसात मी

दरवळल्या गंधात या

का अशी धुंद मी


जाणता अजाणता

आहे तुझ्या प्रेमात मी

तुझ्यावरी प्रेम माझे

बोलले ना शब्दात मी

हळूवार भावना

ठेवल्या हृदयात मी

का मला छळतो असा

तुझीच आहे ना मी


Rate this content
Log in