जाणीवेचा कोरोना
जाणीवेचा कोरोना
साऱ्या देशाची झालीय खूप सारी दैना,
पण 'कोरोना महामारी' काही केल्या जाईना ||
कोरोनाच्या भीतीनं घरातच झालो बंदिवान,
टाळ्या-थाळ्या वाजवूनी केलंया त्याचा सन्मान,
विणल्या नात्यांच्या वीणा जाणीवला कौटुंबिक आपलेपणा,
पण 'कोरोना महामारी' काही केल्या जाईना ||
सरकार होतं सुस्त जनतेचे झाले मात्र हाल,
आरोग्ययंत्रणा लागली कामाला पण प्रयत्न ठरले निश्फळ,
आरोग्याच्या बाबतीत सरकारचा जाणवला ढिसाळपणा,
पण 'कोरोना महामारी' काही केल्या जाईना ||
"मास्क लावा, कोरोना टाळा" हेच आता आपले शस्त्र,
नव्हते हाताला काम पण मदतीचे हात होते सहस्त्र,
कोरोना काळातच घडले माणुसकीचे दर्शन सर्वांना,
पण 'कोरोना महामारी' काही केल्या जाईना ||
लढलो,हरलो,जिंकलो... आले आता जबाबदारीचे भान,
कोरोना योद्यांचा करुनी सन्मान फडकाऊ समतेचे निशाण,
संकटावरी मात करुनी सफल करूया आत्मनिर्भराची घोषणा,
पण 'कोरोना महामारी' काही केल्या जाईना ||
साऱ्या देशाची झालीया खूप सारी दैना,
पण 'कोरोना महामारी' काही केल्या जाईना ||