जान्हवी....एक जीवनवाहिनी
जान्हवी....एक जीवनवाहिनी
1 min
48
नदी वाहते जरी संथ
तरी तिचं कार्य आहे प्रचंड
तिच्याकडून एक नक्कीच शिकावं
काही न ठेवता स्वतःकडे सतत वाहत राहावं
गावच्या नदीचा वेगळाच थाट
कधी वाहते घेऊन नागमोडी वाट
तिचे कार्य आहे खूप महान
भागवते साऱ्या जीवांची तहान
नदीकाठच्या मंदिराला ती स्पर्शून जाते
जणू भगवंताला ती पुजून येते
तिच्या पाण्यावर सर्व करतात शेती
पावसात पूर आल्यावर वाटते मात्र भीती
डोंगर दर्या पार करून
मिळते ती सागराला
अथक प्रयत्नानंतर
यश येतं तिच्या संघर्षाला