STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

जागतिक परिचारिका दिन

जागतिक परिचारिका दिन

1 min
234

नर्सिंगची जननी फ्लोरेन्स नायटिंगेल


जा त धर्म पंथ सारे बाजूस सारून

ग तजन्मीची माय जणू

ति ळतीळ जीव तुटतो म्हणून

क र्म आपले सेवेचे करते....

प रत फेडीची अपेक्षा आव्हेरत

री आपल्या सेवेची नित्य ओढून

चा ल ढकल न करता

रि क्त हस्ते सारे कर्म मनोभावे करते....

का ल ,आज,उद्या सदा सर्वकाळ

दि वस रात्र अविरत राबते

न  थकता सदैव प्रफुल्लित राहून

   सेवा रुग्णांची करते.....

   रुग्णास पाहून तत्पर ती सदा

   स्वतःस झोकून कार्यालागी देते

   वाटते कधी कधी ही परिचारिका

   माय माऊली विश्रांती कधी घेते...?

   माया ममता बंधुता पाहून हृदयीची

   ऊर भरून आदरा पोटी येते

   जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना

   छाती नम्रतेने वंदन करण्या फुलून येते....!


Rate this content
Log in