जागतिक मातृ दिन...!
जागतिक मातृ दिन...!
1 min
417
जागतिक मातृ दिन...!
जा ऊनी सांग माझ्या आईला
ग मत नाही करमत नाही मला
ति च्याविना जीवन जगणे
क सेसेच वाटते मला
मा या ममता सारी आटली काय
तृ षा जन्माची तिच्या शमली काय...?
दि वस रात्र मी तिची वाट पाहतोय
न क्की खरेच तिला समजत नाही काय...?
उगाच नाते रक्ताचे सांगते
अर्ध्यावरच डाव तीन घडीचा टाकून जाते
आणि वरती मला म्हणते
नीट वाग नाहीतर जळक लाकूड फेकते...
आता कुठं गेली तिची माया...?
का हिरावली तिने आमची छाया...?
कोणासाठी सांग आता झिजवू काया...?
दिसल्या जरी ढीगभर जगात आया....!
