जागतिक क्षय रोग दिन
जागतिक क्षय रोग दिन
जा जा कोरोना जा म्हणता
ग ळपटी धरणारा क्षय रोग आठवला
ति टकारून ज्याला आम्ही
क सा का असेना काबूत ठेवला...
क्ष य पावणारी राष्ट्रभक्ती
य मसदनी कोरोनास पाठविण्या सज्ज झाली
रो गप्रतिकारक शक्ती देशाची
ग रगरीत जोमाने वाढीस लागली....
दि वस उगवतो नवा संकल्प घेऊन
न कळत मावळतो चांगले ते देऊन
काय काय दिले या प्रसंगाने जाणवले
प्रयत्न जणू सारे आपले सत्कारणी लागले...
एकजुटीचे अन् प्रेमाचे वारे
देशात आपल्या पुन्हा वाहू लागले
भय जीवनाचे बंधुभावाने आपल्या
जीवनातून खरेच निघून गेले....
रोग कोणताही असो आता भय नाही
प्रतिकारात कसर कोणती राहणार नाही
मी माझा भाव आता राहणार नाही
कोणताही रोग यापुढे देशात उरणार नाही
