जागे व्हा!
जागे व्हा!
तरुणांनो जरा जागे व्हा जागे व्हा
व्हॅलेंटाईनचं भूत आलंय पाहा
सात रंगांची इंद्रधनुष्य कमान
आमची सांगा त्याला आहे महान
रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे,
टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे,
व्हॅलेंटाईन डे हे सात दिवसाचं
पाश्चिमात्यांचं साप्तिक फॅड
सप्त स्वरांची, सप्त रंगांची, सप्त गुणांची,
सप्त रसांची, सप्त वारांची, सुप्त ऋषीची
सप्त राशिंची, सप्त स्वादांची लावून वाट
तरुणांनो तुम्हाला पुरत करतंय मॅड
अंधत्वाची वाटचाल सारी
तरुण पिढीला वाटते भारी
लोभस गोंडस असली जरी
सरते शेवटी म्हणाय लावतंय सॉरी
म्हणून तरूणांनो वेळीच सारे जागे व्हा
वारसा ज्ञानी संस्काराचा पहा जरा
भूत गाडूनी व्हॅलेंटाइनचे आता
सण ट-वार आपल्याच संस्कृतींचे साजरे करा
वेळ ही अमूल्य अजूनही
हातून तुमच्या काही गेली नाही
शिक्षण चांगले घेण्याशिवाय
जगण्यासाठी दुसरा चांगला पर्याय नाही
मौजमस्ती सारे काही जरूर करा
मान मर्यादा राखून तुमचा आनंद लुटा
शिक्षणाची कास धरून नित्य प्रगती करा
स्वप्न सक्षम सदृढ सबळ समृद्ध देशाचे सार्थ करा...!!
