जादू मधुर स्वरांची : लता दीदी
जादू मधुर स्वरांची : लता दीदी
1 min
345
महाराष्ट्राचं भूषण
भारताचा सन्मान
गायन कलाक्षेत्रात
लता दीदी महान !
सरस्वती देवी
संगीत विश्वाची
त्यांच्या कंठात
जादू मधुर स्वरांची !
संगीत क्षेत्रात
मोठं योगदान
गायकी ऐकून
श्रोते तल्लीन !
दैव देणगी लाभली
प्रत्येक गाण्यातली
भावना आवाजातून
हृदयाला भिडली !
गानकोकिळा
पदवी बहाल
देशाला लाभले
रत्न अनमोल !
त्यांच्या गायनाने
मंत्रमुग्ध होते
काव्य लेखनातून
शुभेच्छा देते !
