जादुची कांडी
जादुची कांडी
वाटत कधीतरी मला
भेटावि सुंदर परी
चमचमनारी चंदेरी
साक्षात बसावी समोरी
पंख तिचे शुभ्र
नाक नक्षत्र भारी
बोलन अगदी हळुवार
मनाला मोहित करी
म्हणेल अचानक मला
काय हवय तुला
मिळेल नक्की ते
जें कमी जीवनाला
वाटेल मागाव ऐश्वर्य
तिन्ही त्रिकाल सुख
पण ते तर क्षणिक
परतून येणारच दुःख
अंतःकरनी जाणवले
मागावे इतरांसाठी
ताकद लाभेल त्याना
संकटे पार करण्यासाठी
माणसाने मनापासून प्रेमाने
माणसाला साद घालावी खरी
हीच भावना वसू दे मनी
अपेक्षा तू पूर्ण कर माझी परी
षडरिपु हे अंतर मनातले
ज्याने ग्रासीले सकारात्मकतेला
दूर होवो दुष्कर्मि बुद्धि
सदसद्विवेकबुद्धी दे मानवाला
स्मित हास्य आले तिच्या गाली
म्हणाली फिरवुनी जादुची छडी
कीती रे बिचारा तू विचारी
आली माझी जाण्याची घडी
तूच लढ प्रामाणिकपणे सदा
शिकवण दे साऱ्यांना सत्याची
जेव्हा करनार तू सत्कर्म जीवनी
भासणार तुला कमाल माझ्या जादुची
