जा रे तोड....
जा रे तोड....
बाप्पाने लागवड लावल्या
रस्त्याच्या आजूबाजूला
हिरणीच्या बणात
हेडक्याच्या माळावर
जा रे बबन्या जाऊन तोड
कांडं करून राई राई कर
मोकाट गर्दी रस्त्यावर
बापू बुवा झाडात
जिव असतो म्हणे ?
गेंड्या तूझ्या धोत्राला
पण असेल जीव.
निर्जीव भुताला कसला जीव
आहो मालक
झाड हसात झाड रडतात
झाड वाऱ्यावर ही डोलतात
तोडली की मोठ्यांने ओरडतात
जखमेच मोल माणसालाचं का?
आरे
आज्या पंज्याची बाग आहे
माझ्या. तोडींन फोडीन
काहीही करीन?
त्यांनी तरूण पणी
लावली होती झाड.
म्हणून आता खाताय तुम्ही फळ
ती पण तोडा आणि खावा केळ
आण तो सुरा मी तोडतो.
बापू बुवा मी हात जोडतो.
झाड तुमची संपत्ती असतील
पण...
घरट्यांविना पाखरं
हंबरडा फोडतील.
लाव्या दिव्या करणार्यांनो
लागवड तूमच्यांन होणार
नाही.
झाडे तोडून...
स्वच्छता अभियानाने
अच्छे दिवस येणार नाही.....
