इवली पावले
इवली पावले
1 min
12K
इवल्या इवल्या पावलांचे
आगमन होताच घरात
उल्लासमय होते वातावरण
साजरे होतात सोहळे मनात
जो तो आनंदी होतो
सर्वाना चाहूल लागते
पाळणा सजतो फुलांनी
जोशात बारशे नामकरण होते
पावले पाऊल टाकताच
उत्साही सर्व होतात
बाळ हसत खेळत
धाव घेत चोहीकडे घरात
खुलतो चेहरा पालकांचा
लेकराला पाहून डोळेभरून
सोनेरी भविष्याची नांदी
आशीर्वादाने सुरु करून
