इतक्या दिवस तुला...
इतक्या दिवस तुला...
इतक्या दिवस तुला कोणी नाही बोलले
आज उगीचच तू का स्वतःवर ताशेरे ओढवले
सगळे आपापल्या कामात व्यस्त राहिले
असे कधीच नाही पाहिले हे अगदी मन सुन्न झाले
कधी काळी चुकीचे शब्द ओठातून निघून गेले
आज तू तेच उगाळून सगळ्यांना गप्पशप केले
दुसऱ्याच्या ऐकण्याने तू सर्वाशी मनांत पाप निर्माण केले
आज तुझ्या मनाला तू एक प्रकारे शिंतोडे उडवले
तू सर्व नातेवाईकांत नाव बदनाम केले.
आज तुझ्याशी बोलायला कुणीच नाही धजावले
तुझ्या एका चुकीने सगळे अबोलच राहिले
असं कधीच न होणारे अक्षरशः डोळे पाणावले
