STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Others Children

3  

सचिन विश्राम कांबळे

Others Children

इतके दूर का गेलात?

इतके दूर का गेलात?

1 min
183

बाबा तुम्ही इतके

लांब का गेलात?

शोधून शोधून थकलो

परत कधी येणार ?

इतके लांब ते

आहे कुठे मला सांगा ?

तुमच्या विना करमत नाही

मग मी ही तिथेच येणार

तुमच्या विना लाड माझे

दुसरे कोण करणार ?

रडलो जर का मी तर

उचलुन कोण घेणार ?

इकडे शोधू तिकडे शोधू

काहिच समजत नाय..

तुमच्या शिवाय खाऊ

कोणी दुसरं देत नाय...

पालक दिवस शाळेत

साजरा झाला होता

सगळ्यांचे बाबा होते

पण माझाच बाबा नव्हता

आई म्हणते बाबा त्या

आकाशात रहतात

रोज रात्री शोधत असतो

पण कुठेच नाही दिसतात

त्या ताऱ्या मध्ये राहतात बाबा तुझे

आई असेच सांगते

इतक्या जवळचे बाबांना माझ्या

मला दुरूनच पहावे लागते..


Rate this content
Log in