STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

इतिश्री कोरोनाची

इतिश्री कोरोनाची

1 min
182

कोरोनाने दिलाय या जगाला एक अर्धविराम

अविरत धावणाऱ्या जीवांना मिळाला थोडा आराम


आनंदाची बाब असूनही यामागे दुःख मोठ लपलय

मृत्यूचे भय आणि सावट दुनियेत सर्वत्र पसरलय


प्रत्येक मनुष्यप्राणी जो द्रव्यसंचयात होता मग्न

स्वतःच्या प्राणपक्ष्यापुढे आता सगळेच ठरले नगण्य


या परिस्थितीमुळे उद्मवलाय सगळीकडे हाहाकार

उडालीय लोकांची त्रेधा - तिरपीट अन् धावपळही अपार


सरकाराला आहे आपल्या नागरिकांची चिंता 

त्यासाठीच राबवताहेत काही महत्वपूर्ण मोहिमा 


सगळ्यांनी घ्यावा या आपत्कालीन योजनांचा लाभ 

आणि करावा कोरोना नावाच्या दैत्याचा संपूर्ण विनाश


घेवू काळजी एकमेकांची , कुटुंबाची तशीच समाजाची

शिताफीने करू सामना कोरोना सारख्या यमराजाची


पर्यावरणाचे करू संरक्षण , घेवू काळजी भूमातेची

अशा प्रकारे करता येईल इतिश्री कोरोना विषाणूची



Rate this content
Log in