STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

इतिहासाची पाने उलगडताना

इतिहासाची पाने उलगडताना

1 min
315

आदिमानवरूपात होताच

आजच्या मानवाचा वावर

इतिहासाची पाने उलगडताना

निघाले मुखपृष्ठाचेच कव्हर


वल्कले झाडांची होती वस्त्रे

पायाला बांधायचो झाडपाला

 किती बदललो आज घडीला

 निरागसतेवर पडला हा घाला


नव्हते आधूनिकतेचे तंत्रज्ञान

नव्हते विकार न् दुर्धर आजार

खायचो झाडाचीफळे कंदमुळे

कधीच नव्हतो रोगांनी बेजार


जीवन झालेय सुखवस्तू आता

बदलले सारे आहार नि विहार

जीवन झालेय रोगग्रस्त जर्जर

जीवनात नाहीच राहिला बहार


बैठे काम डोक्याचेच वाढताच

दुखण्यांनी डोकेच वर काढले

व्यायामाच्या अभावानेच आता

निरनिराळे आजारच हे वाढले


चार चाकी गाडीनेच होतो हल्ली

अहोरात्र सारा कामावरचा प्रवास

कसे होईल अन्नपचन जेवणाचे

कसा घ्याल ऑक्सिजनचा श्वास


समाजक्रांती ही सुखसुविधांची

आयूष्य बनलेय आता नरकमय

इतिहासातल्या आदिमानवासम

वाटते व्हावे हे जीवनच सुखमय


Rate this content
Log in