इथं तर काहीच नाही
इथं तर काहीच नाही
1 min
471
इथं खूप लगबग आहे
पण सडा सारवण नाही
देखणी इमारत आहे
पण अंगणात पारिजातक नाही
काळजात वसंत नाही
पापण्यात श्रावण नाही
इवल्याश्या पिल्लासाठी
स्वप्नांचे मणभर ओझे नाही
गावकुस तर आहे
पण गावकुसाला नदीचा काठ नाही आणि
काठाला बालपण नाही
बालपण कधीचच वाहून गेलंय
आता त्या बागेशीही संबंध नाहीयं न्
तुमच्यासाठी जगण्यासाठीचा उत्सवही नाही
आहे असे काहीच नाही
कधीच नव्हतं न् खरंच
तुझी आठवण नाही असे काहीच नाही
तरीसुद्धा इथं लगबग आहे
पण अंगणात पारिजातक मात्र
नाहीच नाही
