इंद्रायणीची हाक
इंद्रायणीची हाक
1 min
167
रूप खुलते तुझे पंढरपुरी
आषाढी एकादशीला
मन उजळून जाते भक्तांचे,पंढरीच्या वारीला
विठ्ठल नामाच्या गजरात
चिंब-चिंब होतो वारकरी
श्रीहरीच्या चरणी लीन होतो सेवेकरी
प्रत्येकाच्या हृदयात जागा होतो पांडुरंग
टाळ चिपळ्या यांच्या निनादात
सारे होतात तल्लीन
वेगळेच चैतन्य ते आसमंतात दाटले
विठुनामाच्या जयघोषात कण न कण भरून पावले
तुझ्या भक्तीचा महिमा
काय सांगू पांडूराया
तुझ्या विना जीव माझा
मुर्ती विना गाभारा
तुझ्या कृपेचा अभिषेक
असू दे भक्तांवर
असाच तू उभा राहा
अजून युगे अठ्ठावीस विटेवर