इच्छापूर्ती
इच्छापूर्ती
1 min
272
हे गणराया, गजानना
वयाची पन्नाशी उलटली
पन्नास वर्षे संसारात रमली
खूप कष्टातही सतत हसली...
आताशा जरा विसावा हवा
खूप झाले जीवन कष्टमय
आनंदाचे दिन पाहू दे देवा
होवू दे जीणं आनंदमय...
मनीच्या कामना पूर्ण होवोत
आशिष दे भगवंता मजला
खणा नारळानं ओटी भरीन देवी
आनंदाचा वाटा देईन तुजला...
क्षणभर दुःखाचे सावट दूर कर
मनीची इच्छापूर्ती थोडी तर कर
साथ हवी तुझी सदैव मजला
माझा आनंदानं हात हाती धर...
किती सांगू व्यथा अंतरीच्या
या जन्मातच सार्या का दिल्या?
अजून काही असतील आता तर
पुढील जन्म घेवू दे बाबा मला...
