STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

इच्छापूर्ती

इच्छापूर्ती

1 min
213

मुलांनी काय काय करावं ?

हे पालकांनी का ठरवावं ?

पालकांचीच इच्छापूर्ती

करण्यासाठी का जगावं


पालकांना वाटे अधुरे स्वप्न

मुलांच्या रूपाने पूर्ण व्हावं

त्याच्यात असो नसो क्षमता

मात्र त्याने स्वप्न पूर्ण करावं


स्वप्न पूर्ण झाले नाही तर

पालकांचा अपेक्षाभंग होतो

पाल्याचा जातो आत्मविश्वास

जीवनात सदा तो मागेच राहतो


कुणाला असते खेळण्याची इच्छा

तर कुणी छान छान पेंटिंग करतो

कुणी असतो अभिनयात निपुण

तर कुणी काम छान सेटिंग करतो


पालकांनो वेळीच सावध व्हा

पाल्याविषयी थोडा विचार करा

त्याचे स्वप्न त्याला पूर्ण करू द्या

आपले स्वप्न लादू नका जरा


Rate this content
Log in