STORYMIRROR

Neelima Deshpande

Others

1  

Neelima Deshpande

Others

' हवं तस '....©®

' हवं तस '....©®

1 min
61

'हवं तसं' तिला कधी जगता येत नसतं ! कारण तिच्या मुळी हक्काच कुठे घरच नसतं! माहेरी असून ती असते परक्याच धन ! मग सासरी तरी कसं कोण जाणणार तिचं मन ? त्याला आवडत रॉक म्यूज़िक, तर ती ऐकते जुनी हिंदी गाणी... निसटत्या क्षणांना बघून, नयनी तिच्या दाटते पाणी... चायनीज खातो तो आवडीने मनापासून, ही मात्र भरते डबा भाजी आणि पोळीचा साजुक तूप लावून! ती कधीच विसरते की, ती आहे आई बाबांची परी .... कारण प्रत्येक गरजेला घेवून सुट्टी अन रजा तिचं तर असते ना घरी ! तो अजुनही आहे घरातला राजकुमार, सुकुमार ! ती मात्र पार गेलीय करपून..... अन राहिला नाही तिच्यात, आता फार काही सुमार ! ती अजुनही जगते आहे, एका खोट्या आशेवर.... असेल माझही कधी काही अस्तित्व वेगळं, आणि होईल माझे नाव साऱ्या जगभर !


Rate this content
Log in