हवेत विरलेले शब्द...
हवेत विरलेले शब्द...
हवेत विरलेले शब्द...
हवेत विरलेले शब्द,
पुन्हा एकदा एकत्र करते,
लिहीताहेत,लिहून गेले अनेक,
पुन्हा नव्याने मी माळेत गुंफते...
खुप काही नवीन नसतेच,
ऐकलेले ऐकवायचे असते,
प्रत्येक हाताची फोडणी वेगळी,
हिच काय? ती चव नविन असते...
वाचलेलेच वेचायचे,
पुन्हा नव्याने झेलायचे,
गद गद झाल्यांचा आनंद,
कविला तृप्ततेचा भास देते...
आपल्या उत्पत्तीवर आपल्यालाच गर्व,
शब्द काव्यात पेरले की,
नविन जन्मल्याच सुखपर्व,
प्रसव ती पाहून मन हर्षते...
हवेत विरलेले शब्द,
पुन्हा एकदा एकत्र करते,
लिहिताहेत,लिहून गेले अनेक,
पुन्हा नव्याने मी माळेत गुंफते...
